Breaking News

मसूर येथे करसंकलन मशिनचा शुभारंभमसूर / प्रतिनिधी ः मसूर ता. कराड येथील ग्रामपंचायतीने पाडव्याच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून ग्रामपंचायत कारभार पारदर्शक होऊन जनतेला गतिमान सुविधा मिळण्यासाठी ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 पर्यंत संपूर्ण कारभार करण्याच्या दृष्टीने आधुनिक पद्धतीच्या संगणकीकृत प्रणालीचा आणि पावती ऐवजी आता मशीनद्वारे बाजार कर संकलन मशिनचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करून एक पाऊल पुढे टाकले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, सह्याद्रीचे संचालक लहूराज जाधव, सुदाम दीक्षित, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, सोसायटीचे चेअरमन शहाजीराव जगदाळे, प्रा. कादर पिरजादे, रणजितसिह जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आधुनिक पद्धतीच्या कार्यप्रणालीमुळे ग्रामस्थांना तत्पर व गतिमान सुविधा मिळण्यास मदत होऊन ग्रामपंचायत कारभार याबरोबरच बाजार करसंकलना मध्ये पारदर्शकता निर्माण होणार आहे. यासाठी अद्ययावत मशिनरी बसवण्यात आली आहे अशी माहिती ग्राम विकास अधिकारी विकास स्वामी यांनी दिली.
कार्यक्रमास नरेश माने, महेश जगदाळे, दिनकर शिरतोडे, प्रकाश माळी, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, संग्रामसिंह जगदाळे, संजय शिरतोडे, प्रमोद चव्हाण, कैलास कांबळे, अक्षय कोरे, सुनील जगदाळे, पूजा साळुंखे,  कांचन पारवे, शुभांगी जगदाळे, वैशाली पाटोळे, रुपाली गरवारे, सुनिता मसुरकर, अलका यादव, निलोफरमोमीन, डी. ए. भोज, तानाजी पार्लेकर, आर. पी. साळुंखे, दिलीपराज लंगडे, रणजीत शहा, बापूसाहेब जगदाळे, रमेश जगदाळे, कासम पटेल, सचिन जगदाळे, व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले आधार संग्रामसिंह जगदाळे यांनी मानले.