Breaking News

ज्ञानगंगा अभयारण्यात पक्ष्यांसाठी वन्यजीव सोयरेंनी ठेवले दाणा-पाणी पक्ष्यांसाठी सोय करून आंबेडकर जयंती साजरी


बुलडाणा,(प्रतिनिधी): ज्ञानगंगा अभयारण्यातील पक्षांच्या दाणापाण्याची व्यवस्था करून वन्यजीव सोयरेंच्या वतीने रामनवमी व भीम जयंती साजरी करण्यात आली. रामनावमीच्या मंगल दिनी राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये पारंपारिक शोभायात्रांचे आयोजनही करण्यात आले. यामध्ये रामाच्या व हनुमानाच्या पोशाखात लहान मुले सहभागी झाली होती. रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपारिक वाद्ये ढोल-ताशांच्या गजरात राम नवमीची व भीम जयंतीची मिरवणूक काढण्यात आली. 

त्याचबरोबर सोशल मीडियातून राम नवमीसह भीम जयंतीचे शुभेच्छांचे संदेश पाठवण्यात आले. मात्र येथील वन्यजीव सोयरेंनी आगळ्या-वेगळया पद्धतीने रामनवमी व भीम जयंती साजरी केली. ज्ञानगंगा अभयारण्यातील पक्षांच्या दाणा पाण्याची सोय वन्यजीव सोयरेंच्या वतीने करण्यात आली. उन्हाळ्यात पक्षांचे पाण्यासह खाद्यासाठी अभयारण्यात भटकंती होते. याचाच विचार करून वन्यजीव सोयरेंनी होळी या सणापासून अभयारण्यात तीन ठिकाणी 15 पॉट लावले आहेत. राम नवमीसह भीम जयंती कशी साजरी करायचे तर ज्ञानगंगा अभयारण्यातील पक्षांच्या दाणा पाण्याची सोय करून वन्यजीव सोयरेंनी साजरी केली. 

अभयारण्यात वन्यजीव सोयरेंनी लावलेल्या पॉटमध्ये पक्षांसाठी पाणी टाकले. तसेच 20 किलो तांदूळ अभयारण्यात लावलेल्या पॉट व मचाण जवळ टाकले. पक्षांना पाणी पिताना आणि तांदूळ खातांना जो आनंद मिळाला तो जगात दुसर्‍या कोणत्याच गोष्टीत नसल्याचे वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी सांगितले. यावेळी वन्यजीव सोयरे जयंत हिंगे, नितिन श्रीवास्तव, मुकुंद वैष्णव, शामभाऊ राजपूत उपस्थित होते. ज्ञानगंगा अभयारण्यातून जाताना व येताना प्रवाशांनी आपल्या जवळ असलेले पाणी पॉटमध्ये टाकून सहकार्य करावे, असे आवाहन वन्यजीव सोयरे यांच्यावतीने करण्यात आले.