Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन


सातारा / प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.