Breaking News

मिरजगाव-गुरवपिंप्री रस्त्याची दुरावस्था; रस्त्यावर खड्डे, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील मिरजगाव-गुरवपिंप्री रस्त्याची गेली अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली असून, याबाबत तक्रार करूनही हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे.

जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागकडे या रस्ताची देखभाल दुरूस्ती असून गेली दोन वर्षापासून हा रस्ता दुरावस्था आहे. या कडे पदाधिकारी डोळेझाक करून या रस्त्यावरून ये जा करत आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वहातूक असून, हा रस्ता मिरजगाव शहरातून जात असल्याने अनेक विद्यार्थी विद्यालयाकडे जाण्यासाठी, नागरीक बसस्थानकाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करत आहेत. नगर- सोलापूर रस्ता ते सीनाच्या कालव्यापर्यतचा दिड किलोमीटर रस्ताची चाळण झाली असून जागोजागी तीन फूटापर्यत खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण या भागात वाढले आहे.


या रस्तावरून उसाची वाहतूक होत असल्याने विद्यार्थी, पादचारी यांच्या जीवीताला धोका होऊ शकतो. रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने साईड पट्ट्याच उरलेल्या नाहीत. हा रस्ता श्रीगोंदे, कोपर्डीकडे जात असल्याने अनेक गावाचा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून निधी उपलब्ध नाही. या नावाखाली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागकडून या रस्त्याची दुरूस्तीची करण्याची टाळाटाळ करत आहे.