Breaking News

दर्शनासाठी आलेल्या भाविकांची लूट करणारा गजाआडशिर्डी/प्रतिनिधी

शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या चारचाकी वाहनाच्या डिकीचे लॉक तोडून मोबाइल व इतर मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गजांआड केले. मोहंमद मुदस्सर मोहंमद युनूस (वय २०, रा. तारफेल, ता. जि. अकोला) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल पोलिसांनी हस्तगत केलाआहे.

औरंगाबाद येथील उमेश ओमप्रकाश शिंदे हे कुटुंबासह शिर्डी येथे साई मंदिरात दर्शनासाठी आले होते. हॉटेलच्या पार्किंगमध्ये असलेल्या शिंदे यांच्या गाडीची डिकी उघडून चोरट्याने मोबाइल वरोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा समांतर या गुन्ह्याचा तपास करत असताना शिर्डी बसस्थानकाबाहेर वपरिसरात एक जण संशयितरित्या चारचाकी वाहनांना हात लावून काचेमधून आत डोकावून पाहत असल्याचा दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुलीदिली. त्याच्याकडून चोरीचा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.

शिर्डी येथे दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. मंदिरपरिसरात मोबाईल नेण्यास मज्जाव आहे. त्यामुळे येणारे भाविक आपले मोबाईल, मौल्यवान वस्तू या गाडीमध्येच ठेवणे पसंद करतात.परंतु नेमके याच गोष्टींमुळे अशा चोरांचे फावते . त्यामुळे परिसरात अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढले. आहे. अनेक भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याचीमागणी भाविकांमधून होताना दिसते.