Breaking News

शक्ती ज्योत शौर्य यात्रेस ‘शिवदुर्ग ट्रेकर्सची’ मानवंदनाकोळगाव/प्रतिनिधी
बहादुरगड, धर्मवीरगड शक्तीज्योत शौर्ययात्रा निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानच्या स्मरणार्थ व्यसनमुक्ती संघटना यांच्यावतीने बहादुरगड पेडगाव ता.श्रीगोंदे जि. अहमदनगर येथे शक्तीज्योत शौर्ययात्रा आयोजित केली होती. यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनने श्रीगोंदे ते पेडगाव धर्मवीर गड अशी मोटार सायकल रॅली काढून शक्ती ज्योत शौर्य यात्रेस मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, फौजदार दौलतराव जाधव, गटविकास अधिकारी काळे यांच्या हस्ते स्मृतीस्तंभाचे व ज्योतीचे पूजन करण्यात आले.

छत्रपती संभाजी राजे यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी बहादुरगड ते तुळापूर अशी शक्तीज्योत आयोजित केली जाते. या ज्योतीचे शासकीय पूजन आज श्रीगोंदे तालुक्यातील शासकीय अधिकार्‍यांनी केले. त्यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्यावतीने अक्षय थोरात याने छत्रपती संभाजी राजे यांची आसमंत भेदून टाकणारी गारद ललकारी दिली. त्यावेळी वातावरण शौर्यशाली झाले. यावेळी अनेक शिवप्रेमी व शंभुप्रेमी उपस्थित होते. व्यसनमुक्ती संघटना, प्रा.नारायण गवळी, भरतरी भागवत दत्तात्रय सस्ते, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे उपाध्यक्ष जालिंदर पाडळे, संदिप हिरवे, संदिप मांडे, संतोष पवार, शरद राऊत, अजित दळवी, दिगंबर भुजबळ, परशुराम आरु, सचिन शिंदे, अशोक गिरमकर, मंगल खराडे यांच्यासह असंख्य मावळे उपस्थित होते.