Breaking News

आरपीआयच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन


अहमदनगर/प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास आरपीआयच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे समवेत शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, राजू माळवे, वैभव मिसाळ, सतीश साळवे, बंटी गायकवाड, एस.एन.साळवे आदी उपस्थित होते.