Breaking News

उत्तर प्रदेशात उधळला हिंसाचाराचा कट


बुलंदशहर : लोकसभेच्या निवडणूका सुरू असतांनाच उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथून पोलिसांनी मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा व अवैध दार जप्त करण्यात आली आहे. 405 हत्यारे आणि 739 जिवंत दारगोळा हस्तगत करण्यात आल्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये हिंसाचारा कट रचला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने बुलंदशहर जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून नियमितपणे तपासणी होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळून आला. यामध्ये 405 अवैध हत्यारं, 739 कार्ट्रिज, 2 कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटींची रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला शस्रासाठा हा मोठा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने जमा करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस अधीक्षक एन. कोलांची यांनी व्यक्त केली आहे.