Breaking News

गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी घेतले शनीचे दर्शनसोनई/प्रतिनिधी
गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी शनीदेवाचे दर्शन घेतले आहे. श्री क्षेत्र काशी आणि प्रवरासंगम येथून कावडीने आणलेल्या गंगाजलाचे ग्रामस्थांनी टाळमृदुंगाच्या गजरात स्वागत केले. तरूणांनी कावडीने आणलेल्या गंगाजलाच्या पाणी शनिदेवास घालण्यात आले. त्यावेळी गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी शनीचे दर्शन घेतल आहे.

शनिसिंगणापूर येथे स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थांची संख्या मोठी यावेळी पहावयास मिळाली. कावड मिरवणुकित देवस्थानचे विश्‍वस्त, अधिकारी, लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गंगा स्नानानंतर काल शनिवारी 12 वा. महंत सरस्वती त्रिंबक महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नववर्षानिमीत्त भाविकांनी सकाळ पासुनच गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. देवस्थानचे कर्मचारी व शिंगणापुर पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक नितीन बेंद्रे यांच्यासह पोलिस तैनात आहेत.