Breaking News

जीवनात अहंकार येऊ देऊ नका- सुनीलगिरी महाराज


नेवासे/प्रतिनिधी: तालुक्यातील श्री क्षेत्र गोधेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहास श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजा रोहनाने व ध्वजपूजनाने उत्साहात प्रारंभ झाला. धर्मकार्य करतांना ते निष्काम भावनेने व श्रद्धेने करा, धर्मकार्यात अहंकार येऊ देऊ नका असे आवाहन महंत सुनीलगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी हभप केशव महाराज शिंदे, नवनाथ पठाडे, सरपंच राजेंद्र गोलांडे, बाळासाहेब पठाडे, संतसेवक संतसेवक बदाम महाराज पठाडे, गोरक्षनाथ पठाडे, किशोर पल्हारे उपस्थित होते. 
 
यावेळी बोलताना महंत सुनीलगिरी महाराज म्हणाले की, ज्ञानेश्‍वरी पारायणाने मनुष्य जीवनात अज्ञान रहात नाही, धर्मकार्य करतांना अहंकार येऊ देऊ नका, परमार्थात संसारी असला तरी कर्मफळाची अपेक्षा न करता जो कार्य करतो तो जीवनात योगी होतो असा संदेश ही त्यांनी यावेळी बोलताना दिला. सात दिवस चालणार्‍या या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात पहाटे सकाळी दुपारी रात्री यावेळेत हरिकीर्तन होणार आहे. दि.23 एप्रिल रोजी श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाचे या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.