Breaking News

घर बांधण्याच्या वादावरून 'शोले स्टाईल' आंदोलन फोटो


चांदे/प्रतिनिधी: घर बांधण्याच्या वादावरून आज सकाळी नऊ वाजता कान्हा बन्सी कोरडे सकाळी पाणी योजनेच्या टाकी वर चढत शोलेस्टाईल आंदोलन केले.

सकाळी कान्हा कोरडे हातात विषारी औषधाची बाटली घेऊन टाकीवर चढले. भाऊ घर बांधणीसाठी आडवा येतो. आमचा वाद आता सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गावकरी यांनीमिटवून न्याय द्यावा. अन्यथा टाकीवरुन उडी मारुन आत्महत्या करील, असे ओरडत होते. एक ते दीड तास कोरडे यांचा हा नाट्यमय प्रसंग चालू होता. यावेळी गावकर्यांनी खाली उतरण्याचीविनंती केली. भावाने सगळ्या अटी नाईलाजाने मान्य केल्या. सोनई पोलीस स्टेशनचे कैलाश देशमाने यांनी शिवाजी माने, राहुल भांड, बाबा वाघमोडे, काका मैरे यांना तातडीने घटनास्थळीपाठवले. पोलीस शिपाई शिवाजी माने टाकीवर जात कोरडे यांना आणले. कोरडे यास सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.