Breaking News

नेप्तीत आंबेडकर जयंती साजरी


अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे पंचशील ग्रुप, सावता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ग्रामस्थांना पाणी बचतीचा संदेश देत योग्य उमेदवार निवडून आनण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आवहन करीत मतदार जागृती करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ओबीसी परिषदेचे नेते रामदास फुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. धम्मवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रामदास फुले यांनी बाबासाहेबांच्या विचाराने बदल घडणार आहे. आज देखील शिकून संघटीत होण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे मानवतेच्या उध्दारासाठी दिशादर्शक आहे. सध्या दुष्काळाचे सावट असून, भविष्यात जलसंकटाचा मोठा प्रश्‍न भेडसावणार आहे. यासाठी पाण्याचे नियोजन व बचत करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

जयंती निमित्त गावातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचशील ग्रुपचे गणेश कदम, विनोद कदम, भानुदास फुले, सुनिल आल्हाट, सुभाष पंडित, महेश कदम, विशाल कदम, विश्‍वास कदम, बाळासाहेब कदम, भोला कदम, अमोल कदम, दत्ता कदम, ज्ञानदेव कदम, संदिप कदम, धनराज आल्हाट, सुरज कदम, साहिल कदम, दत्ता आल्हाट, पप्पू कदम, शुभम काळे, राजेश कदम, कुनाल कदम, संदेश कदम, आदिंसह ग्रुपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.