Breaking News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हाप्रतिनिधी / उंब्रज : पाटण तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे व प्रेमाचे आमिष दाखवून युवकाने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून पीडित मुलीने याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून युवकावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राजदीप प्रभाकर रोकडे (वय 22 राहणार नानेगाव खुर्द ता. पाटण) असे बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

पीडित मुलीने दिलेले फिर्यादी नुसार राजदिप रोकडे हा मागील एक वर्षापासून सदर मुलीला रस्त्यात अडवून वेळोवेळी भेटत होता. तसेच तिला लग्नाचे व प्रेमाचे आमिष दाखवून त्यांच्या वाढदिवसा दिवशी व वेळोवेळी त्याने सदर मुलीला त्याच्या राहत्या घरी बोलून दमदाटी करुन तिच्यावर जबरदस्तीने लैगिक अत्याचार केला.
सदरची मुलगी ही गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे फिर्यादीत म्हटले आहेत. याप्रकरणी राजदीप रोकडेवर उंब्रज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. याप्रकरणात मदत केल्याप्रकरणी त्याच्या आईवरही गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना भांबिष्ट्‌ये करीत आहेत.