Breaking News

असाध्य व्याधीवर मात करत 'तेजल' बँकिंग परीक्षा उत्तीर्णसंगमनेर/प्रतिनिधी
तेजल झुटे ही संगमनेर महाविद्यालयात एम.मराठीच्या द्वितीय वर्गात शिकणारी , महाविद्यालयातील प्रत्येक कार्यक्रमात अग्रस्थानी असणारी विद्यार्थीनीसहा महिण्याची असतांना तिच्या डोळ्यात पहिला डाग आलाआणि नंतर हळूहळू संपूर्ण शरीरावरच काळे डाग उमटलेआई बाबांनी या विचारात मुलीचे नाव तेजल ठेवले होतेपण जणू या तेजालाच ग्रहण लागलेया असाध्य व्याधीवर अजूनही काही इलाज सापडलेला नाहीवडीलआंध्रप्रदेशात नोकरीच्या निमित्ताने गेलेलेआईला सासरी तेजलमुळे काही ऐकावे लागू नये म्हणून मामा स्वमंगेश हिरामन लासुरे यांनी तिला आपल्या घरी आणले आणि अत्यंतिक प्रेमाने तिचा सांभाळ केलाती शिकावीआणि मोठी व्हावी यासाठी मामांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेतेजलही आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने चमकू लागलीआधी वडिलांच्या आणि नंतर नाना  मामांचे निधन असे एकामागुन एक दु:खाचे आघात तेजलवर झालेपणशिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ति तिला बळ देत होतीसंगमनेर महाविद्यालयात कमवा शिका योजनेत ती काम करु लागलीमहाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रात तासंतास अभ्यास करणारी तेजल आज बँकिंगच्याआयबीपीएस परीक्षेत उत्तीर्ण झालीतेजलला बॅंक ॲाफ महाराष्ट्रमधे क्लर्कची जागा लवकरच मिळणार आहेआपल्या दृढनिश्चयाने  सातत्यपूर्ण परिश्रमांनी तिने आज हे यश मिळवले आहेतिच्या या यशाबद्दल संगमनेरमहाविद्यालयातील शिक्षक  शिक्षकेतर सहकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले.

 आंतरीचे तेजोदीप सतत तेवत असतील तर कोणताही अंधार जीवनात तुम्हाला थांबवू शकत नाही याचे मुर्तिमंत उदाहरण तेजल बनली आहेया तेजलचे तेज अनेकांना प्रकाशवाट दाखवेलअसे गौरवोद्गार
डॉसंजय मालपाणी यांनी काढले.