Breaking News

शंकरराव काळेंच्या जयंतीनिमित्त आज पुष्पांजली कार्यक्रमकोपरगाव ता./ प्रतिनिधी - कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक–संचालक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ९८ व्या जयंती निमित्ताने आज पुष्पांजली कार्यक्रम आयोजित केलाआहे. सकाळी ९ वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान, गौतमनगर येथे कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी पाटील आगवण यांनी दिली.

या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, स्नेहल शिंदे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोषकाळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.