Breaking News

कृष्णा हॉस्पिटलमध्ये आजपासून विद्यार्थ्यांसाठी आत्मभान शिबीर


कराड / प्रतिनिधी : येथील कृष्णा हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्यावतीने मंगळवार 16 ते शनिवार 20 एप्रिल दरम्यान 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी आत्मभान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय पैलूंचा अभ्यास करून त्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या पाच दिवसीय शिबिरात बुध्यांक मापन चाचणी, भावनिक बुध्यांकमापन, स्मरणशक्ती सुधारण्याची तंत्रे, एकाग्रती कशी वाढवावी, सृजनशीलता, संवाद कौशल्यांचा विकास, आंतरवैयक्तिक संबंध फुलविण्याची तंत्रे, समस्या हाताळण्याची तंत्रे, निर्णयक्षमता सदृढ करण्याची कला आदींबाबत तज्ज्ञांमार्फत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. 

या शिबिरासाठी 500 रूपये शुल्क आकारले जाणार असून, इच्छुक पालकांनी कृष्णा हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाशी अथवा 9922353809 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.