Breaking News

सापडलेला मोबाईल परत करुन माणुसकीचे दर्शन


पाथर्डी/प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील श्री.संत ज्ञानेश्‍वर सेवा धामचे सचिव तसेच पाथर्डी नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कामकाज पाहणारे भाऊसाहेब वाळके यांना पाथर्डी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत एक मोबाईल आढळून आला होता. त्यानंतर त्यांनी 2 दिवस स्वतः सदर मोबाईल कोणाचा आहे. याची चौकशी केली असता मोबाईल भिंगार येथील रहिवासी संगत यांचा असल्याची खात्री पटताच मोबाइल त्यांच्याकडे मोबाईल सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे भाऊसाहेब वाळके यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. तसेच भाऊसाहेब वाळके यांच्यासारख्या प्रामाणिकपणा मुळे माणुसकीचे दर्शन घडले.