Breaking News

चांदे येथे डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी


चांदे/प्रतिनिधी नेवासे : तालुक्यातील चांदे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. प्रथम चांदे येथील जि.प. प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापीका आसराबाई गारुडकर, शिक्षक भास्कर मरकड, जाधव, शिक्षिका शांता मरकड, स्वाती ठोंबरे, जाधव किंबहुमे, शिंदे, पिंपळे, आदी याप्रसंगी हजर होते. तसेच चांदे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवाद करण्यात आले. 

याप्रांसगी मराठा महासघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजीराव दहातोंडे उपस्थित होते. ज्ञानेश्‍वरचे संचालक मोहनराव भगत, प्रा.पांडुरंग जावळे, रविंद्र जावळे, इंद्रजीत कांबळे, संजय दहातोंडे, उद्धव सोनकर, विजय गवळी, ग्रामविकास अधिकारी महाजर आदी ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थीत होते. तसेच चांदे बसस्थानक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.