Breaking News

मोटारसायकल स्वाराकडून एक लाख रुपये जप्त
कोपरगाव ता/प्रतिनिधी: अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्यावर एका मोटारसायकल स्वाराकडून 1 लाख 7 हजार 590 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूकआयोगाच्या भरारी पथकाने हि कारवाई केली. यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. चौकशीअंती ही रक्कम स्पदंना स्फुर्ती फायनान्शियल लि.हैदराबाद कंपनीच्या कोपरगाव शाखेची आहेअसे निष्पन्न झाले.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यावर आयोगाचे लक्ष असते. कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रेयांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक सहाय्यक खर्च निरिक्षक मनोज सिन्हा, कोपरगावचे उपकोषागार तथा निवडणूक खर्च कक्ष प्रमुख सुनील तडवी यांच्या भरारी पथकाची कोपरगाव-येवलारस्त्यावरील टाकळी फाट्यावर तपासणी असताना एम.एच.15 ए.एन.7051 या दुचाकी वरील तरुणाच्या बँगची तपासणी केली. त्यामध्ये सुमारे 1 लाख 7 हजार 590 रूपये आढळून आले. हीरक्कम जप्त करुन तालुका कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यात आले.