Breaking News

चुकून भाजपला मतदान केल्यामुळे स्वत:चे बोटच कापले



बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघाचाही या 95 मतदारसंघांमध्ये समावेश होता. मात्र या मतदारसंघात मतदान करणार्‍या एका तरुणाने चुकून भाजपाला मत दिल्यामुळे प्रायश्‍चित म्हणून आपले बोट कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता असणार्‍या या तरुणाने बीएसपी ऐवजी चुकून बीजेपी समोरील बटन दाबल्याने त्याचे मत भाजप उमेदावराला गेले म्हणून तो निराश झाला होता.

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याचं मतदान झाले. देशभरातील एकूण 97 जागांसाठी हे मतदान संपन्न झाले. या दरम्यान, बहुजन समाजवादी पक्षाला (बीएसपी) मतदान करण्यासाठी गेलेल्या एका बीएसपी समर्थकाकडून चुकून कमळचे बटण दाबले गेले आणि भारतीय जनता पार्टीला मतदान केले गेले. त्यामुळे या मतदाराने निराश होऊन स्वत:चा बोट कापून घेतला. या व्यक्तीचे नाव पवन कुमार असून तो 25 वर्षांचा आहे. तो अबदुल्लापूर हुलसन या गावाचा रहिवाशी आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील शिखरपूर येथील मतदानाच्या बुथवर त्याने मतदान केलं. मात्र, बीएसपीला मतदान न करता आल्यामुळे त्याने रागात स्वत:चा बोट कापून घेतला.पवन कुमारचा या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो आपल्या मनस्तापाची कहानी सांगत आहे आणि आपला तुटलेला बोटही व्हिडिओमध्ये दाखवत आहे. बुलंदशहरमध्ये सध्याचे भाजपा खासदार भोला सिंग आणि सपा-बसपा-राजद युतीचे योगेश वर्मा यांच्यामध्ये थेट लढत रंगली आहे.