Breaking News

‘शिवम लॉन्स’चा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहर्तावर
जामखेड ता/प्रतिनीधी
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील माजी पोलिस उपनिरीक्षक अधिकारी बोबडे यांच्या शिवम लॉन्स या मंगलकार्याचा शुभारंभ हभप नाना महाराज यांच्या कृपा आर्शिवादाने मान्यवराच्या उपस्थित संपन्न झाला. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा या गावचे सुपुत्र तथा माजी पोलिस उपनिरीक्षक बोबडे हे काही दिवसापुर्वी आपल्या पोलिस दलातील सेवेतून निवृत्त झाले. त्यामुळे ग्रामीण भागाच्या सेवा सुविधासांठी आपण काही तरी करावे, असा मानस नेहमी त्यांच्या विचाराधीन असायचा त्याच विचाराची परीपुर्णता करण्यासाठी पोलिस दलातून सेवा निवृत्त झालेल्या बोबडे मेजर यांनी आपल्या जामखेड तालुक्यातील मुळ पिंपळगाव गावी शिवम लॉन्स नावाने सुसज्ज व सर्व सेवा सुविधा संपन्न असे मंगल कार्यालय बांधले. व याच कार्यालयाचा शुभारंभ आज पाडव्याच्या मुहर्तावर व हभप नाना महाराज यांच्या कृपा आर्शिवादाने यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आला.