Breaking News

अनुराधा पौडवाल यांनी 10 गावे घेतली दत्तक

कांचनजुंगा मोहीम फत्ते
पुणे :  ‘गिरीप्रेमी’ या गिर्यारोहण संस्थेच्या 10 गिर्यारोहकांनी बुधवारी सकाळी जगातील तिसर्‍या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजुनगावर तिरंगा फडकविला. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. एकाच दिवशी 10 च्या आसपास गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर एकाच दिवशी चढाई करणे हा नवा विक्रम. 
......................

अनुराधा पौडवाल साठी इमेज परिणाम

मुंबई : गायिका अनुराधा पौडवाल यांनी दुष्काळ निवारणासाठी नांदेड जिल्ह्यातील दहा गावे दत्तक घेतली आहेत. याबाबत माहिती देतांना त्या म्हणाल्या की - दोन महिन्यांपूर्वी श्रीक्षेत्र माहुर येथे गायनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. येथील भाविकांनी मातृतीर्थ कुंडातील असलेल्या गाळाविषयी माहिती दिली. मी लगेचच सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने गाळ काढण्यास सांगितले. रेणुकामातेच्या आशीर्वादाने आता या कुंडातील झरे मोकळे झाले आहेत. माहुरच्या कुंडासह नांदेड जिल्ह्यातील 10 गावं दुष्काळ दूर करण्यासाठी दत्तक घेतली आहे. यात लोहा तालुक्यातील वडेपुरी, कलंबर, भिलूनाईक तांडा, कामजळगा वाडी, पोलीस वाडी, पोखरभोसी येथे नाला सरळीकरणाचे कामे सुरू आहेत. हे नाला सरळीकरणाचे काम करत असताना वडेपुरी येथे एक मोठा झरा लागला. तसेच माळरानावर असलेल्या काही वाडी-तांडे पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हावेत, यासाठी चर खोदण्याचे काम लोकसहभागातून सुरू आहे. यासोबत कलंबर, दापशेड, कलंबर (खु.), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे शिवनेरी बंधारे बांधण्याचे काम सुरू असून या जलसंधारणाच्या कामामुळे 20 कोटी लीटर पाणी जमिनीत मुरणार आहे. या बंधार्‍यांमुळे पाण्याची पातळी वाढेल. समाजाने दिलेल्या प्रतिष्ठेचे ऋण फेडण्यासाठी ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त गावासाठी परिपूर्ण विकासाच्या माध्यमातून मी त्यांचे ऋण फेडण्याचे प्रयत्न करीत आहे, असे त्या म्हणाल्या.
....