Breaking News

नांदेडच्या 11 पोलिसांवर कारवाई


सातारा / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकांच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये सातारा पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश असताना गैरहजर राहिल्याने नांदेड जिल्ह्यातील अकरा पोलिसांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार कारवाई करण्यात आली आहे. 

हवालदार गुलाब आडे हिमायतनगर, हवालदार कृष्णा मोतीराम चुनोडे, मांडवी, बाबूराव सूर्यवंशी देगलूर, एस एस हुजूरिया वजिराबाद, विजय कोंडाजी धुळंगडे कंधार, साजिद पठाण नांदेड, मुनवर हुसेन नांदेड, हवालदार गोपाळ तोटलवर शिवाजीनगर, हवालदार देवानंद मोरे लिंबगाव, राजीव कांबळे व हवालदार मिलिंद लोणे पोलीस स्टेशन विमानतळ, या अकरा जणांवर कर्तव्य कसूरीचा ठपका ठेवण्यात आला आहे . जि विशा नांदेडचे उपनिरीक्षक विजय पंतोजी यांनी फिर्याद दिली आहे . वजिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा गुंडगे तपास करत आहेत .19 एप्रिल रोजी नांदेड पोलीस मुख्यालयातून अकरा पोलीस कर्मचार्‍यांना तीन टप्प्याच्या पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते . मात्र हे सर्व जण गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कर्तव्य कसूरीचा ठपका ठेवण्यात आला आहे . अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे .