Breaking News

पाचगणीतील ऍस्टन हॉस्टेलमध्ये 15 ते 21 मे दरम्यान क्रीडा प्रशिक्षण


 पांचगणी / प्रतिनिधी : ऍस्टोन हॉस्टेलने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच किडा क्षेत्रात एक पुढचं पाऊल टाकत उन्हाळी विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण 15 ते 21 मे (7 दिवस) दरम्यान आयोजित केले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

पाचगणी येथील ऍस्टन हॉस्टेल स्पोर्ट्स ऍकॅडमीमध्ये अर्चरी (धनुर्विद्या) तलवारबाजी, रायफल शुटिंग, कराटे, हॉर्स रायडिंग, स्विमिंग, कमांडो ट्रेनिंग, योगा (ध्यान), शारारीक प्रशिक्षण, नृत्य, कॅम्प फायर, विविध खेळाचे प्रकार शिकविले जाणार आहेत. वयोमर्यादा 6 ते 21 वर्षे असून प्रवेश प्रक्रिया चालू आहे.
हे प्रशिक्षण नामांकित शिक्षक प्रशिक्षणास मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

आधुनिक साहित्याचा परिचय व आभ्यास, जिल्हा स्थर ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीचे मार्गदर्शन, बौद्धिक विकास, आहार विषयक तज्ञ मार्गदर्शकांचे चर्चासत्र, वयक्तिक लक्ष देऊन प्रत्येक खेळाडूंकडून सराव करून घेतला जाणार आहे अशी माहिती ऍस्टन होस्टेलच्या प्राचार्यांनी दिली आहे.