Breaking News

दादरमध्ये सिलिंडर स्फोटात 15 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू


मुंबई : दादर पोलीस वसाहतीमधील सैतान चौकीतील एका घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला असून यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला होता. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. मात्र, या भीषण आगीत होरपळून 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. 

दादर पश्‍चिम येथील पोलीस वसाहतीतील इमारतीला आग लागली आहे. भवानी शंकर रोडवर ही पोलीस वसाहत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दुपारी दीडच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. मात्र या आगीमध्ये तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये जखमी झालेल्या 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी चव्हाण असं या मृत मुलीचे नाव आहे. श्रावणी चव्हाणने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त दादर पोलिसांनी देखील घटनास्थळी धावा घेतली असून तपास सुरु आहे. दादर पोलीस ठाण्याच्या आवारात असणार्‍या पोलीस अधिकारी वसाहत या ठिकाणी एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील खोलीत भीषण आग लागली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. 

आगीमध्ये तीन घरांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीमध्ये जखमी झालेल्या श्रावणी चव्हाणचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.