Breaking News

‘रयत अथणी’ने 15 टक्के व्याजासह एकरकमी एफआरपी, बिले जमा करावी


कराड / प्रतिनिधी : रयत अथणी साखर कारखान्याने जानेवारी 2019 पासून गाळप केलेल्या उसाचा पहिला हप्ता व एफआरपी आज अखेर दिली दिलेली नाही. तरी प्रशासनाने दखल घेऊन सोमवार (दि.20) पर्यंत रयत अथणी कारखान्याने शेतकर्‍यांचे उसाचे 15 टक्के व्याजासह एक रकमी एफआरपी प्रमाणे बिले जमा करावी. अन्यथा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बरोबर घेऊन बळीराजा शेतकरी संघटना रयत अथणी कारखान्याच्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रांताधिकांर्‍यांना देण्यात आले आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना रयत अथणी कारखान्याच्या एफआरपी बद्दल निवेदन देण्यात आले. 

 निवेदनात दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील रयत अथणी साखर कारखान्याने जानेवारी 2019 पासून गाळप केलेल्या उसाचा पहिला हप्ता व एफआरपी आज अखेर दिली दिलेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे पीक कर्ज थकबाकीत गेलेली आहेत. शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे असूनही कारखाना ऊस बिल देत नाही, त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. बँका दारात वसुलीसाठी उभ्या आहेत. मुलांच्या शिक्षणाला पैसा नाही, तरी प्रशासनाने दखल घेऊन सोमवार (दि.20) पर्यंत रयत अथणी कारखान्याने शेतकर्‍यांचे उसाचे 15 टक्के व्याजासह एक रकमी एफआरपी प्रमाणे बिले जमा करावी. अन्यथा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बरोबर घेऊन बळीराजा शेतकरी संघटना रयत अथणी कारखान्याच्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत शेतकर्‍यांची ऊस बीले बँकेत जमा होणार नाहीत, तोपर्यंत उठणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी. मंगळवारी (दि.21) सकाळी 10 वाजता उस उत्पादक शेतकर्‍यांनी घामाच्या दामासाठी भाजी भाकरी घेऊन मोठ्या संख्येने हजर राहावे, असे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केले आहे. 

प्रांताधिकारी यांना निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटना केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला, सुनील कोळी, विश्र्‌वास जाधव, ज्ञानदेव साळुंखे , विक्रम थोरात, उत्तम खबाले, विशाल कसबे उपस्थित होते.