Breaking News

पिंपरखेडच्या छावणीमध्ये जनावरांना 18 किलो प्रमाणे चार्‍याचे वाटप


जामखेड ता/प्रतिनीधी: जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील घृष्णेश्‍वर ग्रामविकास बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपरखेड या जनावरांच्या चारा छावणीमध्ये शासनाच्या नियमानुसार प्रत्येकी एक जनावरांना प्रतिदिनी 18 किलो वजना प्रमाणे चारा वाटप करण्यात येत आहे. 

तसेच गेल्या तीन महिन्यांपासून ही चारा छावणी सुरू झाल्यामुळे पिंपरखेड परिसरातील पशुधन जगले आहेत. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व जिल्हा अधिकारी व संपुर्ण प्रशासनाने तालुक्यातील चारा छावण्या सुरू केल्याने शेतकर्‍यांची पशुधन वाचले आहे. त्यामुळे पिंपरखेड येथील घृष्णेश्‍वर ग्रामविकास बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपरखेड या जनावरांच्या चारा छावणीमध्ये शासनाच्या नियमानुसार दररोज मका किंवा ऊस व कडवळ आशा विविध प्रकारचे चारा छावणीचे संचालक राजेंद्र ओमासे, व काशीनाथ ओमासे, आबासाहेब नागरगोजे, पृथ्वीराज भोसले, यांच्या प्रयत्नाने व शासनाच्या नियमानुसार उपलब्ध होत आहे. दररोज शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक जनावरांसमोर केली जात आहे. शासनाच्या नियमानुसार दररोज खुराकाचे वाटप केले जाते, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांची छावणीतील प्रत्येक जनावरांची आवश्यक असेल ती तपासणी केली जाते, चारा छावणीमध्ये सुख सुविधा स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे असल्याने कोणत्याही प्रकारचे रोगराही निर्माण होत नाही. तरी पिंपरखेड येथील चारा छावणी सुरू केल्याने आमचे पशुधन वाचले आहे.त्यामुळे शासनाचे व पालकमंत्र्यांचे शेतकर्‍यांनी आभार मानले आहे, अशी प्रतिक्रिया चारा छावणीतील उपसरपंच शहाजी म्हस्के, मधुकर ढवळे, माजी चेअरमन मगन शेख, ठकसेन कांराडे, दतु शिंदे, अंकुश कांराडे, गहिनीनाथ नागरगोजे या शेतकर्‍यांनी व महिलांनी दिली आहे.