Breaking News

पंतप्रधान मोदीविरोधात 200 प्राध्यापकांचा संताप


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये राजकीय नेत्यांची वक्तव्यामुळे अवघे समाजमन ढवळून निघाले आहे. अनेक नेत्यांची बेताल वक्तव्ये, तर कुठे हीन पातळी गाठल्यामुळे अनेकांचा संताप होतांना दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधी विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा अनेकांकडून समाचार घेण्यात येत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील 200 प्राध्यापकांनी मोदींच्या विधानावर सडकून टीका केली आहे. 

शिक्षकांच्या स्वाक्षर्‍या असलेले पत्रक काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी ट्विट केले. पत्रात शिक्षक म्हणतात, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे कर्तृत्व देशाला माहित आहे. देशाने त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. जेव्हा कारगिलमध्ये भारताने विजय मिळवला, तेव्हा आपल्या जवानांनी राजीव गांधी यांच्या कौतुकाच्या घोषणा दिल्या होत्या, असे दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी ’तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राजदरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हणून गाजावाजा केला होता, पण हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचे आयुष्य संपले. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणार्‍याला कधीही माफ करत नाही,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतला. निवडणूक आयोगाकडून मोदींना आतापर्यंत तब्बल 10 वेळा वेगवेगळ्या वक्तव्यांप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधी यांच्याविरोधात केलेले विधान अनेकांना रूचलेले नाही. मोदींना समर्थन आणि विरोध करण्यावरून बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. आता यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांची भर पडली आहे. दिल्लीमधील 200 शिक्षकांनी मोदींच्या त्या विधानावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधानांवर टीका करताना कोणीही अशा पद्धतीने पातळी गाठली नव्हती. अशा शब्दात शिक्षकांनी मोदींवर घणाघात केला आहे.