Breaking News

साध्वी प्रज्ञाकडून 580 लोकांना टोप्या !


भोपाळ : लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आपल्या पक्षांचा, उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कोण कोणत्या प्रकारची शक्कल लढवेल सांगता येत नाही. देशात सर्वात लक्षवेधी असलेली भोपाळच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर कडून आतापर्यंत 580 लोकांना टोपी घातली आहे. निवडणूक आयोगाला देण्यात येणार्‍या निवडणुकीच्या खर्चाच्या तपशीलात याबबतची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत आयोगाला तीन वेळा प्रचारासाठी खर्च केलेल्या खर्चाचा तपशील देणे बंधणकारक असते. त्यानुसार खर्चाच्या दुसर्‍या टप्यातील माहिती देताना दिग्विजय सिंह आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला दिला.  

दुसरीकडे काँगे्रसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी 650 लोकांना चहा पाजला आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनूसार 2 मे पर्यंत दिग्विजय सिंह यांनी 21. 30 लाख रूपये खर्च केले आहेत तर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी 6 मे पर्यंत 11.43 लाख रुपये खर्च केले आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पूर्ण प्रचारासाठी दिग्विजय सिंह यांना काँग्रेसकडून 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या टप्यात 18 एप्रिल रोजी दहा लाख आणि 22 एप्रिल रोजी 40 लाख रुपये देण्यात आले. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रचारादरम्यान जनतेकडून भिक्षेच्या स्वरुपात 4.4 लाख रुपये मिळाले आहेत. त्यांना पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा निधी मिळाला नाही. दोन्ही उमेदवारांनी रहाण्यासाठी आणि गाड्यांसाठी हा खर्च केला आहे. निवडणूक आयोगाने केलेलया चौकशीत हेही समोर आले आहे की, प्रचार सुरु झाल्यापासून 2 मे पर्यंत दिग्विजय सिंह यांनी 3 हजार 840 रुपये 640 कप चहासाठी खर्च केले आहेत. तर प्रज्ञा सिंह यांनी 1 हजार 219 रुपयांच्या 581 टोप्या वाटल्या आहेत. त्यांनी 3 हजार 200 रूपये ढोल आणि दीड हजार रुपये 300 कप चहासाठी खर्च केले आहेत. प्रज्ञा सिंह यांनी 3 हजार 240 रुपयांची फुले घेतली तर 8 हजार 165 रुपये खुर्च्यांसाठी खर्च केले.