Breaking News

अलास्कामध्ये दोन विमांनाची टक्कर, 5 जणांचा मृत्यू


न्यूयार्क : अमेरिकेच्या अलास्कामध्ये दोन फ्लोट (पाण्यामध्ये उतरण्यास सक्षम असणारे छोटे विमान) विमानाची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही विमानांमधून 16 जण प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अग्नेय अलास्कामधील केटचिकान या शहरामध्ये फ्लोट विमानाला अपघात झाला आहे. 

पाण्यावर उडणारी ही दोन्ही विमानं प्रवाशांना घेऊन जात होती. दोन्ही विमानांची हवेमध्ये समोरा समोर टक्कर झाली. या अपघातामध्ये विमानातील 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. तर जखमी झालेल्या 10 प्रवाशांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र या घटनेचा तपास सध्या सुरु आहे.

फ्लोट विमानामध्ये पर्यटनासाठी आलेले रॉयल प्रिंसेस क्रूजचे प्रवाशी होते. त्यांना प्लोट विमानाने पर्यटनासाठी कराई भागात जायचे होते. यूएस फेडरल अविएशन एडमिनिस्ट्रेशन (एफएए) नुसार, कून केव जावळ द हेविलेंड डीएचसी-2 बीवर आणि द हेविलँड ऑटर डीसी-3 ही दोन प्लोट विमानांची टक्कर झाली. या अपघाताचे कारण अद्याप समजले नाही. एका विमानात सहा आणि दुसर्‍या विमानात 11 प्रवाशी यात्रा करत होते. एफएएनुसार, दुर्घटनेवेळी दोन्ही प्लोट विमाने एटीसीच्या ( एयरक्राफ्ट एयर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्कात नव्हती. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही मात्र, ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड याचा तपास करत आहे.