Breaking News

प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घ्यावे : पो.नि.मोरे

वृक्षसंवर्धनाचे साठी इमेज परिणाम
अहमदनगर/प्रतिनिधी : “शहराचे 43 ते 45 अंशांपर्यंत वाढत असलेले तापमान ही निसर्गाची मानवाला एकप्रकारे चेतावनी असून आता प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेतले पाहिजे’’ असे मत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पो.नि. अविनाश मोरे यांनी व्यक्त केले.
शहर वाहतूक नियंत्रण शाखा व हरिभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त श्रमदानातून पत्रकार चौक ते तारकपूर रोड परिसरातील झाडांच्या संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला, त्यावेळी मोरे बोलत होते. यावेळी परिसरातील झाडांना आळे करून पाणी देण्यात आले.
“वृक्षरोपणाइतकेच वृक्षसंवर्धनाचे कार्य महत्वाचे असून शहरातील छोट्या छोट्या झाडांना आळे करुन त्यांना पाणी टाकून संवर्धनाचा उपक्रम हरिभूमी प्रतिष्ठानने हाती घेतला आहे’’ असे अभय ललवाणी यांनी सांगितले.
यावेळी ट्रॅफिक पोलिस स्टाफसह नितीश देशपांडे, गणेश भंडारी, ऋषभ लोढा, आयुष फुलफगर, ऋषिकेश ललवाणी आदिंनी श्रमदान केले.