Breaking News

जवळकाच्या संरपचपदी वंदना वाळूजंकर बिनविरोध

 जामखेड ता/प्रतिनीधी
जामखेड तालुक्यातील जवळका सटवाई या गावच्या संरपचपदी वंदना संतोष वाळुजंकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी
गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करून ग्रामस्थाच्यावतीने जवळका गावात जल्लोष करण्यात आला.
जवळका सटवाई गावच्या संरपचपदाची निवड दि.10 मे. रोजी घेण्यात आली. या निवडणूकी दरम्यान उपस्थित 6 ग्रा.प.सदस्यापैकी वंदना संतोष वाळूजंकर यांचा संरपच पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची संरपचपदी बिनविरोध निवड झाल्याचे या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.गायकवाड मंडल अधिकारी खर्डा यांनी या वेळी घोषित केले. ही निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी मंडल अधिकारी पाचारणे, ग्रामसेवक मोहळकर यांनी विशेष सहकार्य केले. या वेळी ग्रा.प.सदस्या निता बोराडे, सूजाता वाळुजंकर, जयश्री वाळूजंकर, हनुमान दळवी, बब्रुवान वाळुजंकर, चेअरमन पृथ्वीराज वाळूजंकर, कांतीलाल वाळुजंकर, दादा शेख, बाळू साठे, पंडित माने, माजी संरपच दळवी, गुड्डु वाळुजंकर उपस्थित होते.
वंदना वाळूजंकर या शिवसेनेच्या जामखेड तालुका उपप्रमुख संतोष वाळूजंकर यांच्या सौभाग्यवती आहेत. आपण पुढील काळात सर्वाना विश्‍वात घेऊन गावाचा चांगला कारभार करू अशा प्रतिक्रीया नवनिर्वाचीत संरपच वंदना वाळुजंकर यांनी दिल्या. तर गावाने माझ्यावर विश्‍वास ठेऊन संरपच पदाची जबाबदारी आमच्या सौभाग्यवती वंदना यांच्यावर सोपवली असल्याने गावकर्‍यांचा विश्‍वास सार्थ ठेऊन पुढील काळात गावात विकास कामे करू व शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवू असे या वेळी संरपचांचे पती संतोष वाळूजंकर यांनी सांगितले. निवडी नंतर संरपच वंदना वाळूजंकर यांचा सत्कार करण्यात आला.