Breaking News

मनोवेध संस्थेच्या वतीने तीन दिवसीय कार्यशाळा


अहमदनगर/प्रतिनिधी: युवकांमध्ये चैतन्य व स्फुर्ती जागवून त्यांना यशस्वी जीवनाच्या वाटचालीस मार्गदर्शन करण्याच्या हेतूने नाशिक येथील मनोवेध हेल्थव्हयू संस्थेच्यावतीने नगरमध्ये तीन दिवसीय युवा स्पंदन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रोड येथील श्रमिक भवन येथे शनिवार दि.25 मे रोजी या कार्यशाळेस प्रारंभ होणार असून, यामध्ये मानस विकास तज्ञ तथा जीवन कौशल्य प्रशिक्षक अमोल कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन मनोवेध संस्थेचे स्थानिक उपक्रम समन्वयक डॉ.सुनिल कात्रे यांनी केले आहे. दि.25 ते 27 मे दरम्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे. महाराष्ट्रात गाजलेली ही कार्यशाळा युवकांचा जीवन बदलण्याचा प्रवास आहे. वय वर्ष 13 पुढील कोणीही या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांसह युवक-युवतींना पुढील आयुष्याचे ध्येय निश्‍चितीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.