Breaking News

दुष्काळ निवारणासाठी पालकसचिवांना जिल्हा दौरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशदुष्काळ निवारणासाठी पालकसचिवांना जिल्हा दौरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश


मुंबई / प्रतिनिधीः राज्यातील दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पालक सचिवांनी जिल्हा दौरे करून 21 मे पर्यंत अहवाल सादर करावेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे 48 तासात निराकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. टँकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पीकविमा यासारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.