Breaking News

नथुराम देशभक्तच ःसाध्वी प्रज्ञासिंह

Image result for साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ ः नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहील असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. नथुरामला दहशतवादी ठरवणार्‍या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

भोपाळमधून साध्वी प्रज्ञासिंह या निवडणूक लढवत आहेत. हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले आहे. अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे म्हटले होते. त्यानंतरही वाद निर्माण झाला होता. नथुरामबाबत प्रश्‍न विचारला असता प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामला देशभक्त म्हटले आहे.