Breaking News

उद्धवराव नेवसे यांना प्राउड महाराष्ट्रीयन सन्मान


कर्जत/प्रतिनिधी: शैक्षणिक, बँकिंग व व्यापार क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्धवराव नेवसे यांना समाजसेवक, पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राहुल द्विवेदी यांच्या हस्ते प्राऊड महाराष्ट्रीयन या सन्मानाने नेवसे यांना सन्मानित करण्यात आले. अहमदनगर येथील माऊली संकुल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यापूर्वी नेवसे यांना विविध सन्मान तसेच पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. सद्गुरू उद्योग समूहाच्या माध्यमातून उद्धवराव व शंकरराव नेवसे या बंधूंनी भरीव काम केले आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच बँकिंग तसेच कृषीपूरक व्यवसायामध्येही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. नेवसे यांना जिल्हापातळीवर सन्मानित केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.