Breaking News

मोळाचा ओढा येथे तिघांकडून एकास बेदम मारहाण


सातारा / प्रतिनिधी : दारू पिऊन रस्त्यातून वेडा-वाकडा चालत जात असल्याने तीनजणांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना मोळाचा ओढा येथे शुक्रवारी रात्री 12.30 वाजता घडली. यात प्रशांत विठ्ठल माने वय 29 रा. वनवासवाडी हे जखमी झाले आहेत.

प्रशांत माने हे शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास मद्यप्राशन करून घरी जात होते. त्यावेळी मोळाचा ओढा येथे आले असता त्यांना तीन जणांनी तू रस्त्यातून वेडा-वाकडा का चालतोस असे म्हणत मारहाण केली यात ते जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.