Breaking News

मोदींच्या तर्कहीन दाव्यांमुळे जगात भारताचे हसू राज ठाकरे यांची घणाघाती टीका

राज ठाकरे साठी इमेज परिणाम
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची पातळी ओलांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तर्कहीन दाव्यांमुळे जगात भारताचे हसू होत असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरूवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला जी स्वप्ने दाखवली जी आश्‍वासने दिली. त्यातले एकही पाळले नाही. नरेंद्र मोदी त्याबद्दल आता बोलतही नाहीत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचेही समर्थन पंतप्रधान कशा काय करू शकतात असेही राज ठाकरेंनी विचारले. आता जनताही मोदी सरकारला कंटाळी आहे. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी जनतेला दिलेल्या आश्‍वासनांवर का भाष्य करत नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.
जे लोक देशातील लोकशाही खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना निश्‍चितपणे सडेतोड उत्तर द्यायला हवे. देशात कोणतेही सरकार आले तरी दहशतवाद्याला ठेचलेच पाहिजे. दहशतवादी हा दहशतवादी आहे त्याचे राजकारण काय करायचे? असेही राज म्हणाले. दहशतवादी हा दहशतवादी असतो त्याला हिंदू, मुस्लीम अशी लेबल लावण्याची गरज नाही. एकदा कळले की तो दहशतवादी आहे की त्याचा ठेचलेच पाहिजे अशी रोखठोक आणि आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले गेले, बोस्टनमध्ये एक स्फोट घडवण्यात आला. या स्फोटाला जे जबाबदार होते त्यांना दीड दिवसात अटक झाली. ट्विन टॉवर पाडण्याचा कट रचणार्‍यालाही ठार करण्यात आलं. याला म्हणतात कृती किंवा दहशतवादाविरोधात उचलेलं ठोस पाऊल. या दोन घटना सोडल्या तर अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला नाही. दहशतवादाला उत्तर अशा प्रकारे द्यायचं असतं असं उदाहरणही राज ठाकरेंनी दिलं. दहशतवाद ठेचलाच पाहिजे यात काहीही शंका नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्याचं राजकारण कसं काय करू शकता असाही प्रश्‍न राज ठाकरेंनी विचारला आहे.आहे. दरम्यान 17 मे रोजी ठाण्यात शेतकर्‍यांचा शेतमाल थेट विकण्यासाठी मोर्चा निघणार आहे. या मोर्चासंदर्भात राज ठाकरेंनी एक आवाहनही केले आहे. 17 मेच्या दिवशी दुपारी 1 वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे. गावदेवी मैदान ते महानगरपालिका असा मोर्चा काढला जाईल. शेतकर्‍यांना एकट्याने असो किंवा सामूहिकपणे असो त्यांनी उत्पादित केलेला माल विकण्यासाठी सहकार्य केलंच पाहिजे अशी राज ठाकरेंची भूमिका आहे.