Breaking News

नगरला रविवारी शालेय मुलांसाठी धावण्याची स्पर्धा


अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या महावीर चषक परिवाराने खास शालेय मुलांसाठी 100 मीटर धावण्याची स्पर्धा येत्या रविवारी (12 मे) आयोजित केली आहे. मुलांनी मैदानी खेळांमध्ये सहभागी होऊन शरीर सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी 7 वाजता भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमधील आदर्श व्यापारी मित्र मंडळ, मॉर्निंग क्रिकेट क्लब, सकल जैन समाज व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने भगवान महावीर चषक 100 मीटर धावण्याची स्पर्धा 16 वर्षांखालील मुला-मुलींसाठी होणार आहे. यात मुले व मुली स्वतंत्र गट आहेत. मुले व मुलींच्या गटात 8 ते 10 वर्षे, 11 ते 13 वर्षे व 14 ते 16 वर्षे असे प्रत्येकी 3 गट आहेत. स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना मेडल, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देण्यात येणार आहे. मॅरेथॉनपटू संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. 

शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, नगर मर्चंट्स बँक, साईदीप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, गाल्को ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, भन्साळी टीव्हीएस ऑटोमोबाइल्स, नरेंद्र बाफना ग्रुप तसेच अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया आदींच्या सहकार्याने होणार्‍या या स्पर्धेचे नियोजन राजेंद्र ताथेड, राजेंद्र गांधी, अतुल शेटिया, रूपेश भंडारी, प्रीतम गुंदेचा, पारस शेटिया, प्रवीण शिंगवी आदींनी केले आहे. माहितीसाठी 9421332302 या क्रमांकावर संपर्क साधावा.