Breaking News

शनिमारुती मंदिराचा पाया खोदताना ‘नाणी’ सापडली


शेवगाव/प्रतिनिधी : शनिमारुती मंदिर जिर्णोद्धारानिमित्त पाया खोदत असतांना मातीच्या भांड्यात प्राचीनकालीन नाणी सापडली आहेत. ही नाणी कास्य धातुची असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शेवगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत भाजी मंडई लगत तीनशे ते चारशे वर्षापुर्वीचे पुरातन शहराचे आराध्य दैवत शनिमारुती देवस्थानचे मंदिर आहे. या मंदिराच्या ट्रस्ट व समितीने लोकसहभागातून जिर्णोद्धार हाती घेतला आहे. तीन ते चार हजार वर्ष हे मंदिर सुस्थितीत राहील असे पाच सहा कोटी रुपये खर्चाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी तीन महिन्यापुर्वी विधिवत पुजा करुन काम चालू करण्यात आले आहे. या मंदिराचा पाया खोदत असतांना सोमवारी यात मातीच्या छोट्या भांड्यात प्राचीनकालीन नाणी आढळून आली आहेत.

ही नाणी कास्य धातुची असावीत असा अंदाज असून त्यावर फारशी लिपीची भाषा कोरलेली दिसते. ही नाणी मंदिर बांधकामानंतर तेथे सग्रंहीत करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ.निरज लांडे यांनी सांगितले. गेल्या चार पाच वर्षापुर्वी मुंगी येथील गोदावरी नदीपात्रात उत्खनन करतांना अशाच प्रकारची नाणी आढळली होती.