Breaking News

आसिफ यांच्या चिञांचा दिल्लीत झेंडा


देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील राहुरी कारखाना येथील रहिवासी असलेले ग्रामीण भागात जन्मलेल्या असिफ शेख या चिञकाराचा संघर्षमय जीवन प्रवास थक्क करणारा आहे. दिल्ली येथे भरलेल्या चिञप्रदर्शनात असिफच्या पाठिवर दिल्लीकरांनी थाप टाकून कौतुक केले.

राहुरी कारखाना येथे वडील शरीफ फिटर असूून त्यावरच प्रपंच जेमतेम चालवला जात आहे. मुलगा चिञ काढून पोट भरु शकेल का? हा प्रश्‍न त्यांना सतावत होता.अनेक सुशिक्षीतांनीही असिफच्या डोक्यातून चिञकलेचे भूत काढून फिटरकीमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. माञ, चिञकार होण्याची जिद्दच असिफला यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरली. राहुरी कारखाना येथील छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5 वीच्या वर्गात शिकत असताना असिफला चिञ काढण्यात रस वाटू लागला. 

चिञकलेचे शिक्षक प्रशांत सुर्यवंशी यांनी असिफमधील कलाकार हेरला. असिफमधील चिञ कलाकाराला प्रोत्साहन दिले. चिञकला परीक्षेला मार्गदर्शन मिळाले. राहुरी खुर्द येथील साई गजानन चिञकला महाविद्यालयात असिफने दोन वर्षाचा एटीडी व एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स पूर्ण केला. त्यातून चिञकला बहरण्याला उत्तेजन मिळाले. 

पत्नीसह असिफने मुंबई गाठली. रहेजा स्कूल आँफ बांद्रा येथे थेट दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळाला. सकाळी शिक्षण व दुपारी चंद्रजी यादव यांच्या स्टुडिओत काम करण्याची संधी मिळाली.त्यानिमित्ताने पेंटींगचा शोध घेता आला. आयुष्यातील पहिले चिञ साडेतीन हजार रुपयांना विकले. विकलेल्या पहिल्या चिञाचे पैसे वडिलांच्या स्वाधीन केले. चिञकलेच्या माध्यमातून करिअर करता येईल, असा विश्‍वास शेख परिवारामध्ये निर्माण झाला. असिफचे आतापर्यंत 30 पेक्षा जास्त ठिकाणी चिञ समूह प्रदर्शन लागले. मुंबई येथे आर्ट गँलरी येथे एकल प्रदर्शन भरले होते. अमृतचिञ पद्धतीने तयार केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक गीतांजली मायनी यांच्या हस्ते झाले. देशात राजधानीत भरलेल्या चिञप्रदर्शनाला अनेकांनी भेटी देऊन असिफला शाब्बासकीची थाप दिली.

कला फाऊंडेशन स्थापन करणार- आसिफ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चिञकलेत करिअर करावे म्हणून असिफ नजिकच्या काळात फौंडेशनची स्थापना करण्याचा मानस आहे. चिञकला क्षेञातून विविध विषयामध्ये करिअर करता येते.त्या दृष्टिकोनातून चिञकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी करिअर करावे अशी असिफची इच्छा आहे.