Breaking News

ज्योतिष अधिवेशनाला अंनिसचा विरोध

विरोध साठी इमेज परिणाम
नाशिक : शहरात होत असलेल्या राज्यस्तरीय वास्तु-ज्योतिष आधिवेशनाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निमुर्लन समितीने विरोध केला आहे. येत्या 18 व 19 मे रोजी नाशिक शहरात होत ज्योतिष आधिवेशन होत आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिध्द करून दाखवावे तसेच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाबाबत यापूर्वीच दिलेले आव्हान पेलून दाखवावे असे समितीने म्हंटले आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे आणि जात पंचायतबाबतीतील राज्य समन्वयक कृष्णा चांदगुडे यांनी यासंदर्भात विरोध करणारे निवेदन दिले आहे. फल ज्योतिष आणि वास्तुशास्त्र निव्वळ थोतांड आहे. प्रचलीत वास्तुशास्त्र अभ्याक्रमाच्या व्यतिरीक्त लोकांच्या अज्ञानाचा, अगतिकेतचा फायदा होऊन काही धुर्त व्यक्ती आणि संस्था राजरोसपणे समाजाची आर्थिक व मानसिक लुट करत असल्याचे म्हटले आहे.