Breaking News

पराभवाची जबाबदारी स्वीकारीत राहुल यांच्या राजीनाम्याची तयारी


नवी दिल्लीः सलग दुसर्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीच्या पराभवानंतर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्याचे बोलून दाखवले आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 44 जागांवर विजय मिळवला होता. आता मोदी सरकारच्या विरोधात जोरदार प्रचार केल्यानंतरदेखील काँग्रेसच्या हाती फार काही हाती लागले नाही. लोकसभेच्या 542 जागांपैकी काँग्रेस केवळ 50 जागांवर आघाडीवर आहे. या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपचे अभिनंदन केले. तसेच जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. अमेठीतून स्मृती इराणी यांच्या विजयाबद्दलदेखील त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमेठीच्या मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. देशाच्या जनतेने त्यांचा निर्णय स्पष्टपणे दिला आहे, असे ही ते म्हणाले. राहुल यांच्या पाठोपाठ प्रियंका यांनीदेखील मोदी व भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.