Breaking News

ठाण्यात रंगणार सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा

ठाणे : लहान वयातच मुलांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्वराज्य इव्हेंटसच्यावतीने सिंगिंग सुपरस्टार ही गायन स्पर्धा प्रथमच ठाण्यात आयोजिण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे ऑडिशन ऑनलाइन होणार असून दोन गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यामध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम आयोजित करणार्‍या स्वराज्य इव्हेंटसच्यावतीने आता गायन स्पर्धा आयोजिली आहे. या स्पर्धेमध्ये भाषेचे किंवा गायन प्रकाराचे कोणतेही बंधन नाही. यात ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबईचेही स्पर्धक सहभागी होऊ शकतात. 5 ते 10 आणि 10 ते 15 अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. कौशल इनामदार हे या स्पर्धेचे मार्गदर्शक आहेत. पत्रकार परिषदेला उक्ती फाऊंडेशन च्या संस्थापिका गीतांजली लेले, स्वराज्य इव्हेंटसचे हर्षद समर्थ उपस्थित हते. हल्लीच्या लहान मुलांमध्ये खूप टॅलेंट दडलेले आहे. त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, लहान वयातच त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग यावे आणि स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे हाच या स्पर्धेमागचा उद्देश आहे, असे कौशल इनामदार यावेळी म्हणाले. स्पर्धेच्या ऑडिशनसाठी 15 मे ते 31 मे या दरम्यान पाठविलेले व्हिडिओ स्वीकारले जाणार आहेत. सहभागी होण्यासाठीुुु.ीुरीरक्षूरर्शींशपीीं.लेा या वेबसाइटवर नावनोंदणी करावी. स्पर्धकांनी एक ते दीड मिनिटांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ीळपसळपर्सीीशिीीींरी09सारळश्र.लेा या ई मेल आयडीवर पाठवावा. ऑडिशन राऊंडचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यात येईल. फेसबुक पेजवरील व्हिडिओला मिळालेले लाइक्स ( 10 टक्के) आणि परीक्षकांनी दिलेल्या गुणांची (90 टक्के) बेरीज करुन निवड होणार आहे. अंतिम फेरीसाठी 20 स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून ती नावे 5 जून रोजी घोषित केली जातील. दोन्ही गटांतून तीन पारितोषिके देण्यात येणार आहे. अभिजित करंजकर आणि ओंकार मुळ्ये हे स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.