Breaking News

भिंगारच्या मारुती मंदिरात वारकरी वैष्णव मेळावा


वारकरी साठी इमेज परिणाम

भिंगार/प्रतिनिधी : येथील वडारवाडी परिसरातील दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये काल आणि आज दिनांक 15 ते 16 या दिवशी वारकरी वैष्णव मेळावा झाला. श्रीपाद बाबा चव्हाण (घोटी) व रामदास बाबा बुधवारे, अमृतबाबा यांच्या कृपाशीर्वादाने, रामदास महाराज शेंडे, रामदास महाराज गाडलकर, ह.भ.प.उबाळे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय वारकरी वैष्णव मेळावा आयोजित करण्यात आला होता,
या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार शिवाजीराव कर्डिले, मार्केट कमिटी संचालक हरिभाऊ कर्डिले, माजी सरपंच सुरेश तागडकर, माजी सरपंच मच्छिंद्र तागडकर, माजी सरपंच हनुमंता आळकुटे, वडारवाडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच संजय धोत्रे, उपसरपंच राजकुमार इटेवार, ग्रामसेवक मनोज बनकर, नागरदेवळे गावचे सरपंच राम पानमाळकर, बाळू तागडकर, युगलशरणजी महाराज (गोविंद धाम ), अरुण महाराज धाडगे, अमोल सपकाळ, संतोष छत्रेकर, मोहन शेलार, सखाराम आळकुटे, गोविंद तागडकर आदींच्या उपस्थितीत उदघाटन, दीपप्रज्वलन, वीणा पूजन, कलशपूजन, ग्रंथपूजन, प्रतीमापूजन, प्रवचन,कीर्तन आदी कार्यक्रम झाले. दिनांक 16 गुरुवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत दत्तात्रय महाराज तोडमल (भिंगार) यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसाद भोजन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन अनिता हनुमंत आळकुटे, हनुमंत शंकर आळकुटे, पूजा आळकुटे (श्रीमद् भागवत कथाकार व कीर्तनकार), शिवाजी शंकर आळकुटे यांनी केले.