Breaking News

पंतप्रधान मोदी नेते नसून अभिनेते प्रियंका गांधी यांची टीका

Image result for प्रियंका गांधी
मिर्झापूर ः लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम अभिनेते आहेत. मोदींपेक्षा बीग बी अमिताभ बच्चन यांना पंतप्रधानपदी बसवले असते, असा टोला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लगावला आहे.
मिर्झापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ललितेश त्रिपाठी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांनी येथे जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी हे नेते नाही, अभिनेते आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या अभिनेत्याला आपण पंतप्रधानपदी बसवले आहे. यापेक्षा बीग बी अमिताभ बच्चन यांना पंतप्रधानपदी बसवायचे होते. तसेही जनतेसाठी कामे करायची नव्हती, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी फिरकी घेतली. नरेंद्र मोदी पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा पंतप्रधान झाले, तर नवा चित्रपट पाहावा लागेल. पंतप्रधान मोदी निवडणुका आल्या की, नव्या गोष्टी रचतात. जनतेसाठी काम करणार्‍याला मतदान करायचे की, विकासाच्या केवळ गप्पा करणार्‍यांना मत द्यायचे. यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन प्रियंका यांनी यावेळी केले.
यावेळी प्रियंका गांधी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त होता, असे वादग्रस्त विधान साध्वी यांनी केले होते. आज त्यावरच प्रियंका यांनी ‘महात्मा गांधींचा मारेकारी देशभक्त? हे राम’ असे ट्विट केले आहे. साध्वी या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्यांना भाजपकडून भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. साध्वी वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत.