Breaking News

राफेलचा प्रश्‍न विचारताच मोदींनी पत्रकार परिषद गुंडाळली

Image result for राफेलचा प्रश्‍न विचारताच मोदींनी पत्रकार परिषद गुंडाळली
पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे मोदींनी टाळले ; अमित शाह यांनी दिले उत्तरे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते. मात्र या पत्रकार परिषदेला पत्रकारांनी राफेलचा मुद्दा विचारताच ही पत्रकार परिषद गुंडाळली आहे. महत्त्वाचे म्हणजे या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्‍न विचारण्यात आले होते. मात्र, या पत्रकार परिषदेमधील सर्वच प्रश्‍नांची उत्तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आणि मोदींनी यावेळी मौन पाळले असल्याचे दिसून आले. भाजपच्या मुख्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकारपरिषदेत बोलतांना मोदी म्हणाले की, भारत हा जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगावर आपल्या देशानं छाप सोडली पाहिजे असं मला वाटतं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात विविधेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र होतात. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळं एकत्ररित्या सुरू आहे. सोशल मीडिया आल्याने पत्रकारांनाही कष्ट उपसावे लागले आहेत. निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा  खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेलं सरकार येईल असाही विश्‍वास मोदींनी व्यक्त केला आहे. देशाच्या जनतेचा कौल काय येईल ते 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. देशाच्या विकासाचे निर्णय आम्ही घेतो आहोत. यापुढेही घेऊ असेही मोदींनी म्हटले आहे. आज पत्रकार परिषदेला येऊन मला खूप आनंद झाला. मी आधी हेच करत होतो आज खूप दिवसांनी पत्रकार परिषदेला आलो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
2014 मध्ये देशाच्या जनतेने आम्हाला बहुमत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशाची जनतेने तो प्रयोग केला होता. त्याला आम्ही नरेंद्र मोदी प्रयोग असे म्हणतात. त्यामुळे आम्ही तेव्हाच ठरवलं होता की 2019 लाही असाच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे कार्यकर्ते आणि आम्हा सगळ्यांसाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषदेला हजर आहेत ही आनंदाची बाब ठरते आहे. आमची पाच वर्षे संपत आली आहेत, नरेंद्र मोदी प्रयोग लोकांनी, देशाने स्वीकारला. यावेळीही बहुमताने आम्ही निवडून येऊ असा विश्‍वास अमित शाह यांनी व्यक्त केला. भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षात जो विकास केला त्यामुळे लोकशाहीवरचा जनतेवरचा विश्‍वास दृढ झाला असे अमित शाह यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचाराच्या आज तोफा थंडावणार आहेत. आत्तापर्यंत भाजपाने केलेला प्रचार सर्वात मोठा प्रचार आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत यामागे होती असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. मोदी सरकार पुन्हा यावं यासाठी भाजपाच नाही तर जनताही प्रयत्नशील आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. भाजपाने आत्तापर्यंत अनेक चांगली कामं केली आहे. भाजपाने दिल्लीत प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या आधी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत अमित शाह बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारने दर 15 दिवसांनी एक नवी योजना आणली. याचा सरासरी आकडा 133 योजनांपर्यंत पोहचला आहे. देशातले गरीब, शेतकरी, महिला, आदिवासी या सगळ्यांपर्यंत या योजना पोहचल्या आहेत. आमच्या सरकारमुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्‍वास दृढ झाला. 2014 मध्ये आमच्याकडे 6 राज्यांची सत्ता होती. आता आमच्याकडे 19 राज्यांची सत्ता आहे. कारण आम्ही विकासाला महत्त्व दिले. गरीबांचे, सामान्यांचे रहाणीमान कसे उंचावेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले, असेही अमित शाह यांनी म्हटले आहेत.

प्रज्ञासिहंचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेऊ
नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांच्यावर भाजप काय कारवाई करणार ? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यानंतर प्रज्ञा ठाकूरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून येत्या 10 दिवसात त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे अमित शाहांनी सांगत पुन्हा एकदा साध्वी प्रज्ञाच्या विषयावर पडदा टाकला आहे.