Breaking News

‘सह्याद्री देवराई’चा आदर्श घ्यावा : धर्मवीर सालविठ्ठल


म्हसवड / प्रतिनिधी : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून धामणी (ता. माण) येथे साकारला जात असलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पांचा तालुक्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा, असे मत जिल्हा वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ल यांनी व्यक्त केले .

धामणी, ता. माण येथे त्यांनी सह्याद्री देवराईला भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी सालविठ्ल पुढे म्हणाले, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सह्याद्री देवराई हा प्रकल्प दिवडीनंतर धामणी येथे साकारला असून हा परिसर हिरवाईने नटणार आहे. लागवड केलेली झाडे चांगल्या प्रकारे लागून निघाली आहेत. भविष्यात या परिसरात हा प्रकल्प खूप फायदेशीर ठरेल. लोकांनी धामणी येथील देवराईला नक्की भेट द्यावी आणि अशा प्रकारची देवराई प्रत्येक गावाच्या ठिकाणी उभारली पाहिजे. कोणतेही काम होण्यासाठी ग्रामस्थांचे व निसर्गप्रेमी लोकांचे खूप सहकार्य अपेक्षित असते. त्याप्रमाणे धामणी ग्रामस्थांनी या कामी मोलाचे सहकार्य केल्याने येथे देवराई यशस्वी झाली आहे. झाडे लावण्याबरोबर त्याचे संगोपन आणि संवर्धन हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर गावांनी असे प्रकल्प हाती घेतल्यास पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यासाठी मदत होण्याबरोबर पर्जन्यमान ही वाढण्यास मदत होईल असे ते म्हणाले.