Breaking News

नामाचे दही , प्रेमाची लाही म्हणजे काला - ह.भ.प.तिडके


देवळाली प्रवरा प्रतिनिधी: नाम आणी प्रेमरुपी काला वाटण्याकरता संत या भूमीमध्ये अवतरले होते. आणी जनसामान्यांच्या अंतःकरणात त्यांनी नाम आणी प्रेम जागृत केले. हेच वारकरी संप्रदायातील काल्याचे स्वरुप आहे. नामाचे दही ,प्रेमाची लाही यांचे एकत्रीकरण म्हणजे काला असे प्रतिपादन ह.भ.प.तिडके महाराज यांनी केले.

देवळाली प्रवरा येथील शहरवासीयांच्या वतीने आयोजित केलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद्भागवत कथा सोहळ्याच्या सांगते प्रसंगी काल्याच्या किर्तनाची सेवा देताना ते बोलत होते.

यावेळी काल्याच्या महाप्रसादानिमित्त पुरणपोळीचा प्रसाद केला होता. पुरणपोळीचा काला प्रथमचदेवळालीकरांनी अनुभवला. यावेळी खा.सदाशिव लोखंडे, सिताराम ढुस, नगराध्यक्ष सत्यजित कदम , नगरसेविका संगिता चव्हाण, अशोक खुरुद , प्रा. दत्तात्रय मुसमाडे, प्रभाकर कराळे, राजेंद्र चव्हाण, कांता कदम, किरण चव्हाण , अनंत कदम, डाँ.संदिप मुसमाडे, मच्छिंद्र कराळे, अनिल चव्हाण, मधुकर चव्हाण , रेवणनाथ लहारे, मंदा चव्हाण आदी उपस्थित होते.