Breaking News

संगमनेर बस स्थानकावर चोरीच्या घटनांत वाढ


संगमनेर/प्रतिनिधी:संगमनेर बस स्थानकावर चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. बस स्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा, पोलीस चौकी असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु नवीन बस स्थानक आणि व्यापारी संकुल तयार होऊनही सुरक्षेच्या बाबतीत बस स्थानक बेवारस आहे असे म्हणावे लागेल. काल फलाटावर उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लंपास केली.

याबाबत अधिक माहिती अशी : गोपाल मोतीलाल भुतडा (वय-६७, रंगारगल्ली, संगमनेर) हे काल संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास नाशिकला जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकावर उभे होते. नाशिकला जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ६९ हजार रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन ओरबाडली. यावेळी भुतडा यांना कोणीतरी आपल्या गळ्याची चैन ओढल्याचे जाणवले, परंतु गर्दीचा फायदा घेऊन चोर त्याठीकाणाहून पसार होण्यात यशस्वी झाला.